Sharad Pawar ED LIVE : शरद पवार आज ईडी कार्यालयात, मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी | mamaharashtra state co bank scam sharad pawar go at ed office



Sharad Pawar ED office, Sharad Pawar ED LIVE : शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर (money laundering sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत. (Sharad Pawar ED office) मात्र, शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे. पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.
LIVE UPDATE :

शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी 

भाजपकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार हे आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत, महाराष्ट्र निवडणुकीच्या महिनाभरआधी कारवाई, सरकारच्या सूडभावनेचा निषेध, राहुल गांधींचं टीकास्त्र #SharadPawar
27/09/2019,11:19AM

संजय राऊत यांचे आभार : जितेंद्र आव्हाड 

शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार,अशा काळात पक्षभेद विसरून ते पाठीशी उभे, शरद पवारांनी 50 वर्षाच्या राजकारणात अनेक विरोधी पक्षनेत्यांना मदत केली आहे. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे समजतो
27/09/2019,11:00AM

इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपविरोधात निदर्शने 

27/09/2019,11:05AM

हिंगोलीत रस्त्यावर टायर पेटवून निदर्शने 

27/09/2019,11:05AM

कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही : धनंजय मुंडे 

शरद पवार आणि राष्ट्रवादींच्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून कारवाई, या देशात लोकशाही आहे की नाही? शरद पवारांचं कुठंही नाव नाही, तरीही ईडीने कारवाई करणं हे भयंकर आणि सहनशीलतेपलिकडे. सामान्य माणसासाठी सदैव झटणाऱ्या नेत्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न, म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबण्यासारखं. कायदा सुव्यवस्था राखणं केवळ आमचं काम नाही, ते पोलीस आणि ईडीचेही काम आहे, शरद पवारांचं नाव गुन्ह्यात का? या देशातील लोकशाही धोक्यात आहे- धनंजय मुंडे
27/09/2019,10:48AM

पवारांचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात, परिस्थिती हाताळण्यासाठी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
27/09/2019,10:41AM

शासकीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी, भाजपवर संजय राऊत यांची टीका

शरद पवार हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. बँकेत घोटाळा झाला त्यांना शासन झालेच पाहिजे. पण घोटाळ्यामध्ये नावच नाही तरी शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल होतो ही शंकेची बाब आहे. शासकीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी होत असेल तर हे फार चुकीचे आहे, असं संजय राऊत म्हणाले.
27/09/2019,10:36AM

कायदा सुव्यवस्थेसाठी सहआयुक्त विनायक चौबे शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक येथे पोहोचले
27/09/2019,10:04AM

कायदा सुव्यवस्थेसाठी सहआयुक्त चौबे शरद पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे काहीच वेळात पोहोचणार
27/09/2019,9:54AM

ईडीची प्रेस नोट ही भाजपच्या कार्यलयातून निघाली, भाजप ईडीचा गैरवापर करत आहे, तक्रारदार अरोरा संघाचे कार्यकर्ते, आम्ही भाजपला घाबरणार नाही, परिस्थितीशी दोन हात करण्याची आमची तयारी : नवाब मलिक
27/09/2019,9:52AM

आमची भूमिका ठाम आम्ही ईडी कार्यालयासमोर जाणार : नवाब मलिक
27/09/2019,9:51AM

27/09/2019,9:36AM

शरद पवार हे मलबारहील येथील सिल्वर ओक इथल्या घरुन दुपारी एक ते दीडच्या सुमारास ईडी कार्यालयाकडे निघतील
27/09/2019,8:56AM

शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथल्या निवास्थानी कार्यकर्त्यांची लगबग सुरू, रोहित पवार यांनी सकाळीच पवारांची भेट घेतली
27/09/2019,8:56AM

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी थेट सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेत शरद पवार साहेबांवर घातलेलं षड्यंत्र दूर करावे असं साकडं घातलं
27/09/2019,8:56AM

मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
शरद पवार आज (27 सप्टेंबर) दुपारी दोन वाजता ईडीच्या मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर राहातील (Sharad Pawar ED office). दरम्यान, पवारांना ईडी कार्यालयाकडून बोलवण्यात आलेलं नाही ते स्वत:हून कार्यालयात जाणार असल्याने त्यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार, अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजार कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.
ईडीने शरद पवारांना अद्याप चौकशीला बोलावलेलं नाही. तर शरद पवार स्वत: ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीचे मुंबईचे सहसंचालक शरद पवारांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. केवळ अर्धा तास ते तासाभरात पवारांना ईडीमधून सोडलं जाईल, अशीही माहिती आहे
ईडी प्रश्न विचारणार नाही
दरम्यान, शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जातील. मात्र, ईडीकडून त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत. ईडीने अद्याप पवारांसाठीची प्रश्नावली तयार केलेली नाही. ईडीने अद्याप पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेला नाही. चौकशीसाठी कुणाला हजर करायचे हा तपास अधिकाऱ्याचा विशेषाधिकार असतो आणि त्यासाठी ठोस कारणं हवी असतात. सध्या ईडी या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करत असून, जबाब नोंदवण्यात येत आहेत. त्यामुळे आवश्यकता भासेल, तेव्हा पवार यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितलं.
ईडीने शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप तपास अधिकाऱ्याचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे ईडी आज शरद पवारांना प्रश्न विचारणार नाही.
शरद पवारांवर गुन्हा का?
दरम्यान, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.
For more information go for this link: https://www.tv9marathi.com/

Comments

Popular posts from this blog

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर होणार

Due to good rainfall in drought-hit Marathwada, so far 122 mm rainfall is recorded

ENG vs NZ: Match tie and super over tie, how to beat England?