पुढे संधी मिळणार नाही हे धोनीला सांगा; सेहवागचा निवड समितीला सल्ला
https://www.tv9marathi.com/sports/virender-sehwag-advised-team-india-selecters-should-talk-to-ms-dhoni-about-his-retirement-plan-91095.html नवी दिल्ली : धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती कधी घ्यावी, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे, असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं. तसेच, आता निवड समितीनेही धोनीला त्यांची रणनिती सांगून द्यावी, असं आवाहन सेहवागने केलं. कारण, विश्वचषक संपल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अशा वेळी 2011 मध्ये 28 वर्षांनी भारताला विश्वविजेते पद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आगामी विंडीज दौऱ्यातूनही वगळल्याची बातमी आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज धोनीच्या खेळावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यंदाच्या विश्वचषकात धोनी फार काही कमाल करु शकला नाही. त्यामुळे या विश्वचषकानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तर, माझ्या निवृत्तीबाबत मलाच कल्पना नाही, असं स्पष्टीकरण धोनीने दिलं होतं. मात्र, भारताच्या वेस्ट इंडिज...