ईडीचा पवारांना ई-मेल, तूर्तास चौकशीची गरज नाही! | ED mail to Sharad Pawar
https://www.tv9marathi.com/mumbai/ed-mail-to-sharad-pawar-no-need-for-inquiryr-right-now-117740.html मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ED mail to Sharad Pawar ) हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत . मात्र त्यापूर्वीच ईडीचा फ्लॉ शो (ED mail to Sharad Pawar ) पाहायला मिळत आहे. कारण तूर्तास चौकशीची गरज नाही, असं पत्र ईडीने शरद पवारांना ई मेलद्वारे पाठवलं आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार हे स्वत:हून आज ईडी कार्यालयात जात आहेत. पवार स्वत: जात असल्याने राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. मात्र शरद पवारांना ईडीने चौकशीचीच गरज आताही नाही आणि भविष्यातही नाही, असं पत्र ई मेलद्वारे पाठवलं आहे. शरद पवारांनी ईडीला मेल केला होता, त्या मेलला उत्तर म्हणून ईडीने सध्या शरद पवारांच्या चौकशीची गरज नाही, असं म्हटलं. याबाबत नवाब मलिक म्हणाले, “आम्हाला आधीपासून...