Posts

ईडीचा पवारांना ई-मेल, तूर्तास चौकशीची गरज नाही! | ED mail to Sharad Pawar

Image
https://www.tv9marathi.com/mumbai/ed-mail-to-sharad-pawar-no-need-for-inquiryr-right-now-117740.html मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ED mail to Sharad Pawar ) हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत . मात्र त्यापूर्वीच ईडीचा फ्लॉ शो (ED mail to Sharad Pawar ) पाहायला मिळत आहे. कारण तूर्तास चौकशीची गरज नाही, असं पत्र ईडीने शरद पवारांना ई मेलद्वारे पाठवलं आहे. त्याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार हे स्वत:हून आज ईडी कार्यालयात जात आहेत. पवार स्वत: जात असल्याने राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. मात्र शरद पवारांना ईडीने चौकशीचीच गरज आताही नाही आणि भविष्यातही नाही, असं पत्र ई मेलद्वारे पाठवलं आहे. शरद पवारांनी ईडीला मेल केला होता, त्या मेलला उत्तर म्हणून ईडीने सध्या शरद पवारांच्या चौकशीची गरज नाही, असं म्हटलं. याबाबत नवाब मलिक म्हणाले, “आम्हाला आधीपासून...

पवारांवर गुन्हा चुकीचा, संजय राऊतांची प्रतिक्रिया, आव्हाड म्हणाले थँक्यू! | Sanjay Rauts said ED case against Sharad Pawar is is not fair Jitendra Avhad thank him for supporting Pawar

Image
https://www.tv9marathi.com/maharashtra/sanjay-rauts-said-ed-case-against-sharad-pawar-is-is-not-fair-jitendra-avhad-thank-him-for-supporting-pawar-117734.html मुंबई :  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला. मात्र, कुठल्याही तक्रारीत नाव नसताना देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांवर (money laundering sharad pawar) गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते  संजय राऊत  (Shivsena Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही, तर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तर संजय राऊत हे दुसऱ्या पक्षातील असूनही त्यांनी शरद पवारांचं समर्थन केलं, यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले (Jitendra Avhad-Sanjay Raut). “शरद पवार हे महाराष्ट्रतीलच नाही तर देशातील ...

काळवीट शिकार प्रकरण : जोधपूर न्यायालयात सलमानला हजर राहण्याचे आदेश

Image
https://www.tv9marathi.com/entertainment/court-orders-salman-to-appear-in-jodhpur-court-in-black-hunting-case-117612.html जयपूर  : काळवीट शिकार प्रकरणी (Black Hunting Case) आज (27 सप्टेंबर) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Actor Salman Khan) जोधपूर न्यायालयात (Jodhpur Court) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी होणार आहे. काळवीट शिकार प्रकरणात (Black Hunting Case) जोधपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडून सलमान खानला (Actor Salman Khan) पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. पण सुनावणी दरम्यान, सलमानला न्यायालयात उपस्थित राहावे लागेल, असे आदेशही न्यायालयाने दिले होते. गेल्या सुनावणी दरम्यान सलमान न्यायलयात हजर राहिला नव्हता. त्यानंतर, न्यायाधिशांनी सलमानच्या वकिलांना खडसावले होते. नंतरच्या सुनावणी दरम्यान सलमानने उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच जर तो सुनावणी दरम्यान उपस्थित राहिला नाही, तर त्याचा जामीन रद्द करण्यात येईल, अशी ताकीदही न्यायाधिशांनी दिली होती. यावेळीही सलमान खान न्यायालयात...

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Image
          https://www.tv9marathi.com/maharashtra/live-update-and-breaking-news-on-tv9-marathi-                    117600.html शरद पवार उद्या बारामतीच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार  बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील पूरस्थितीची माहिती घेतली, सकाळी फोनवरुन पूरस्थितीचा आढावा, प्रशासन, पदाधिकारी यांनी दाखवलेल्या दक्षतेबद्दल कौतुक, शरद पवार उद्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार 27/09/2019,9:37AM जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला  TV9 Marathi ✔ @TV9Marathi # औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, 45 हजार क्यूसेक्सने जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू, जायकवाडी धरणाच्या 16 दरवाजातून 45 हजार विसर्ग सुरू, गोदावरी नदीला तुफान पूर, अनेक पूल पाण्याखाली, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा 11 8:31 AM - Sep 27, 2019 Twitter Ads info and privacy See TV9 Marathi's other Tweets 27/09/2019,8:58AM...